मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कुणाल बेनोडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर सध्या कुणाल आणि सोनालीच्या जोडीची चर्चा सुरू आहे. सोनालीचा पती कुणाल नक्की आहे तरी कोण ते जाणून घेऊयात..सोनालीच्या पतीचं नाव कुणाल बेनोडेकर असून ‘केनो’ या नावानेही त्याची ओळख आहे.कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत राहतो. त्याचे कुटुंबीय लंडनलाच राहतात. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं.त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.लग्नानंतर आता सोनाली दुबईतच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. शूटिंगनिमित्त ती भारतात येईल, असं समजतंय.सोनाली आणि कुणाल या दोघांवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.