नागपूर : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं हाहाकार (Coronavirus) माजवला आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune) नंतर नागपुरातही (Nagpur Corona Update) कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव आहे. एका दिवसात हजारी नागरिक कोरोनाबाधित होताहेत. मृत्यूच्या संख्याही भयावह आहे. त्यामुळे शहरातील स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. काही दिवसांआधी असलेल्या या परिस्थितीत आता लक्षणीय सुधारणा होताना दिसतेय. विशेष म्हणजे आता नागपुरात कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona) ओसरण्यास सुरुवात झाली आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तब्बल ८० दिवसानंतर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी १००० च्या खाली आली आहे. (second wave of corona is getting mild in Nagpur)

Also Read: नशा करणाऱ्या तरुणांनो सावधान! नागपुरात ‘ड्रग्स फ्री सीटी’ संकल्पना

मार्च आणि एप्रिल महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ दिसून आली. त्यामुळे दररोज जिल्ह्यात ८०-१०० मृत्यू होऊ लागले. यामुळे प्रशासनाला नाईलाजानं लॉकडान करण्याची वेळ आली. लॉकडाउन होणार या भीतीनं नागरिकांनी बाजारांमध्ये प्रचंड गर्दी केली. मात्र याचा परिणाम दिसून आला तो कोरोना रुग्णांच्या संख्येत. अचानक नागपुरातील कोरोना रूग्णांचा आकडा फुगला. दररोज हजारो नागरिक पॉझिटिव्ह येऊ लागले. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात

नागपूर जिल्ह्यात गेल्या ८० दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले होते. मात्र आता हा आकडा खाली येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूंची संख्या पण घटतेय. म्हणूनच नागपुरात जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवा झाली आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

पालकमंत्र्यांनी मानले नागरिकांचे आभार

“स्थानिक प्रशासन, राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेसह नियोजित प्रयत्न, सततचा पाठपुरावा, बेडची वाढती संख्या, ऑक्सिजन आणि औषधाची उपलब्धता आणि लॉकडाऊन यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोविडचा आलेख कमी झाला आहे. नागरिक आणि सर्व कोविड योद्धांचे मी मनापासून आभार मानतो”. असं ट्विट पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलंय.

चाचण्यांची संख्या घटली

गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येतही प्रचंड घट दिसून आला. अचानक कमी होत असलेल्या चाचण्यांमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Also Read: अखेर नागपूर महापालिकेला सुचलं शहाणपण! खाजगी रुग्णालय बिलासंदर्भात समिती स्थापन

(second wave of corona is getting mild in Nagpur)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here