घुणकी (कोल्हापूर) : वारणा नदीवरील चावरे-घुणकीच्या (Chawre-Ghunki Varna River) हद्दीतील बंधाऱ्यावरुन पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतल्यानंतर येथील युवक बुडाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. विजय भिमराव शिंदे (वय.२५ रा.घुणकी) (Ganesh Shinde)असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.
vijay shinde accident case in kolhapur ghunki marathi news
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी,
विजय शिंदे हा मंगळवारी (ता.१८) दुपारी जनावरांच्या गोट्यात सुरु असलेले काम संपवूनमित्रांसोबत सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणा नदीच्या चावरे-घुणकी हद्दीतील बंधाऱ्यावर पोहण्यास गेले. नदीला पाणी भरपूर असल्याने बंधाऱ्यातून मोठा प्रवाह सुरू आहे. याच ठिकाणी सर्वजन पोहत होते. विजयने बंधाऱ्यावरुन उडी मारल्यानंतर तो प्रवाहातून वर आला नसल्याचे मित्रानी सांगितले.


पोलिसांसह नातेवाईकांनी तपास केला परंतु विजयचा तपास लागला नाही. त्यानंतर आज सकाळी नऊच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनचे सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, सिध्दार्थ पाटील, सतिश पाटील, पृथ्वीराज पाटील, रोहित जाधव यांच्या पथकाने पेठवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, फौजदार खान, काँस्टेबल नरसिंह कुंभार, रेणुसे, पोलीस पाटील संदीप तेली, तलाठी प्रशांत काळे, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्यातून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वारणा नदीत तपास सुरू केला आहे. पण दुपारी दोन पर्यंत विजयचा शोध लागला नाही.
हेही वाचा- 60 स्थलांतरित पक्षांचा मुक्काम लांबला; पर्यावरणीयदृष्ट्या मानली जात आहे चांगली नांदी
विजय शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत व त्याचा भाऊ अजय वर्धा येथील पथकर नाक्यावर नोकरीस असून ते लाॅकडाऊन पासून घरी होते. ते दोघेही जनावरांच्या गोट्याची दुरुस्ती करीत होते. त्यांच्या वडिलांचेही चौदा वर्षांपूर्वी छत्र हरपले आहे. परिस्थिती गरीबीची आहे. विजय वारणा नदीत वाहून गेल्याने शिंदे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
vijay shinde accident case in Chawre ghunki marathi news
Esakal