क्रिकेट जगतात मयंती लँगर हे नाव चांगलेच लोकप्रिय आहे. ती भारतातील नावजलेल्या स्पोर्ट्स नेटवर्कसाठी काम करते. अनेक स्पर्धेत ती होस्टच्या भूमिकेत दिसली आहे. यात 2011 क्रिकेट वर्ल्ड कप, 2014 इंडियन सुपर लीग, 2015 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचाही समावेश आहे. मयंती अँगर सोशल मीडियावरही चांगली सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून एका चाहत्याला खास रिप्लाय दिला होता. याची जोरदार चर्चाही झाली. एका चाहत्याने मयंतीला चक्क डेटवर येशील का? असा प्रश्न विचारला. यावर मयंतीने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Also Read: …म्हणून पृथ्वी शॉ भारतीय संघाबाहेर
काही दिवसांपूर्वी मंयतीचा पती आणि क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्या नेटकऱ्यांनाही मयंतीने जशास तसे उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. मयंतीने बोलती बंद करणारे ट्विटलाही लोकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्याचवेळी एका युजर्सने मयंतीचे कौतुक करताना तिला चक्क डेटवर येशील का? असा प्रश्न विचारला.

Also Read: COVID-19 Vaccine : टीम इंडिया इंग्लंडमध्ये घेणार दुसरा डोस
युजर्सने लिहिले होते की, तू अँकरिंग करत असतेस म्हणून आयपीएल बघू वाटते. मयंती ही क्लास आणि व्यक्तीमत्वाचे उत्तम मिश्रण आहे, असे म्हणत युजर्सने मयंतीला डिनरला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हर्टवाल्या इमोजीसह त्याने ही पोस्ट लिहिली होती. यावर मयंतीने खास रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. मला तुमच्यासोबत डिनर करायला आवडेल. यावेळी तिने डिनरला येण्याची एक अट घातील. पतीसोबत डिनरचा आनंद घ्यायला येईन असे ती म्हणाली. तिने स्माइलसह दिलेला हा रिप्लाय सोशळ मीडियावर व्हायरल हतो आहे.
Esakal