‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खानने Gauahar Khan तिच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. गौहरने सोशल मीडियावर तिचा पती झैद दरबारसोबत Zaid Darbar एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. ‘स्त्रियांवर पुरुषांचं वर्चस्व आणि पुरुषांच्या पायांजवळच स्त्रियांचं अस्तित्व म्हणजे खरा इस्लाम’, अशी कमेंट एका ट्रोलरने केली. त्यावर गौहरने संबंधित ट्रोलरला सुनावलं आहे. (Gauahar Khan schools troll who claimed woman is a domination of man)

‘नाही मूर्ख माणसा, याला मैत्री, प्रेम आणि एकमेकांची साथ देणं म्हणतात. इस्लाममध्ये स्त्रियांचं वर्णन हे पुरुषांच्या अस्तित्वापेक्षा वरचढ किंवा त्यांच्या खाली नाही तर त्यांच्या बरोबरीने केलं आहे. त्यामुळे ती त्याच्या हृदयाजवळ राहू शकते. मूर्खासारखं काहीही बडबडण्याआधी शिका आणि गोष्टी नीट जाणून घ्या’, असं उत्तर गौहरने दिलं.

Also Read: सोनाली कुलकर्णीचा पती आहे तरी कोण?

गौहर आणि झैदने २५ डिसेंबर २०२० रोजी निकाह केला. झैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. झैद हा डान्सर आणि कोरिओग्राफर असून त्याचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here