नवी दिल्ली : देशात सत्तेत आल्यापासून मोदी सरकार (Prime Minister Narendra Modi) सोशल मीडियावर (Social Media) सर्वाधिक सक्रिय आहे. सरकारी निर्णयापासून तर टीकांना उत्तर देण्यासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला जातो. देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशी स्थिती असताना हे सरकार सोशल मीडियावर काय करत आहे? हे जाणून घेण्यासाठी आघाडीच्या दैनिक भास्कर या हिंदी वर्तमानपत्राने मोदी मंत्रिमंडळातील १० मोठ्या मंत्र्यांचे १ ते १४ मे दरम्यान केलेल्या ट्विट्सचे विश्लेषण केले आहे. या मंत्र्यांनी या १४ दिवसांमध्ये एक हजार ११० ट्विट्स (Twitter) केले आहेत. भास्करने ट्विट्सची संख्या, कोरोनाविरोधात तयारीशी ट्विट्स, कोरोनाबाधितांना मदतीशी संबंधित ट्विट्स, शोक संदेशाशी संबंधित आणि जयंती व पुण्यतिथीशी संबंधित ट्विट्स, अशा पाच कसोट्यांवर पडताळून हे विश्लेषण केल्याचे वृत्तात सांगितले आहे. (BJP Government’s Top Ministers Twitts Analyse In Covid Pandemic)

Also Read: ‘या’ गोष्टी पाळल्या तरच कोरोनाची तिसरी लाट सौम्य असेल

१.गृहमंत्री अमित शाहा

गृहमंत्री अमित शाहा यांनी १ ते १४ मे दरम्यान कोरोनाशी लढण्याच्या तयारीबाबत फक्त १ ट्विट केले आहे. त्यात पंतप्रधान मोदींद्वारे दीड लाख ऑक्सिकेअर सिस्टिमची खरेदीला मंजूरी दिल्याची माहिती दिली गेली आहे. त्यांचे टाईमलाईन पाहून कळतच नाही, की देश भयानक अशा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे की नाही. निवडणूक, जयंती, पुण्यतिथी, शोक संदेशाशी संबंधित अनेक ट्विट्स करण्यात आले आहेत.

२.संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग १ ते १४ मे दरम्यान ट्विटरवर सर्वात कमी सक्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. या दरम्यान त्यांनी कोरोनाशी संबंधित एकूण पाच ट्विट केले आहे. त्यात लष्कराकडून होत असलेले कामे आणि लखनऊ दौऱ्याचा उल्लेख आहे. त्यांनी मोदींचे काही ट्विट्सही रिट्विटही केले आहेत. या व्यतिरिक्त शोक संदेश, जयंती आणि पुण्यतिथीबाबत ट्विट आहेत.

३.रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी इतर मंत्र्यांच्या तुलनेत ट्विटर आणि ग्राऊंडवर जास्त सक्रिय दिसतात. १ ते १४ मे दरम्यान त्यांनी कोरोनाशी संबंधित ३२ ट्विट केले आहेत. ते विशेषतः नागपूर व विदर्भात सक्रिय आहेत. त्यांचे ट्विट अधिकाऱ्यांबरोबर बैठका, वर्ध्यात जेनेटिक लाईफ सायन्सेस आणि ड्रायव्ह इन व्हॅक्सिनशी संबंधित होते. त्यांनी आपल्या कोणत्याही ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख केलेला नाही.

नितीन गडकरी

६.रेल्वेमंत्री पीयूष गोयल

१ ते १४ मे दरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयलचे बहुतेक ट्विट ऑक्सिजन एक्स्प्रेसशी संबंधित आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेस देशातील वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करत आहे. गोयल यांनी मोदींच्या निर्णयांची कौतुक करणारे अनेक ट्विट केले आहेत.

७.माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर यांनी १ ते १४ मे दरम्यान केलेल्या ट्विटमध्ये लसीचे अपडेट, सरकारच्या प्रयत्नाबाबत माहिती दिल्याचे दिसते. त्यांनी मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भाजपच्या ट्विटर हँडलने केलेले अनेक ट्विट रिट्विटही केले आहेत.

प्रकाश जावडेकर

८.शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल १ ते १४ मे दरम्यान २८५ ट्विट केले आहेत. यातील ८३ ट्विट कोरोनाशी संबंधित होते. १४ दिवसांत २४ ट्विटमध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख करुन त्यांची प्रशंसा केली आहे. या व्यतिरिक्त दररोज त्यांनी स्वतःची कविताही ट्विटरवर पोस्ट केली.

९.अर्थमंत्री निर्मला सीतारमण

१ ते १४ मे दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण ट्विटरवर इतर मंत्र्यांच्या तुलनेत कमीच सक्रिय राहिल्या. त्यांनी एकूण ४८ ट्विट केले. त्यात २२ कोरोनाशी संबंधित होते. यात बहुतेक ट्विटमध्ये कोविडशी संबंधित अर्थमंत्रालयाकडून होणाऱ्या मदतीचा उल्लेख केला होता. त्यांनी मोदींचे ट्विट रिट्विट केले आहेत.

१०.अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी

१ ते १४ मे दरम्यान अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी एकूण ४७ ट्विट केले. त्यात कोरोनाशी संबंधित १३ ट्विट होते. या व्यतिरिक्त त्यांनी ईद साजरा केल्याचे फोटोही पोस्ट केले. मात्र अल्पसंख्यांकांना उद्देशून एकही ट्विट नव्हते. एखाद्या कोरोनाबाधिताला मदतीबाबत एकही ट्विट केले नाही. जसे की हाॅस्पिटल बेड, ऑक्सिजन, औषधे किंवा अन्य प्रकारे मदत असे अपेक्षित आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here