इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी विकेट किपर बॅट्समन सारा टेलर हिचा आज वाढदिवस. निवृत्तीनंतर सारा इंग्लंड कांउंटी क्रिकेटमधील पुरुष संघाला यष्टीमागचे धडे देण्याचे काम करत आहे. पुरुष सिनियर संघाला कोचिंग देणारी ती पहिली महिला क्रिकेटर आहे.
वन-डे सामन्यांमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा महिला क्रिकेटमधील विक्रम साराच्या नावे आहे.
क्रिकेटच्या मैदानातील लक्षवेधी कामगिरीशिवाय सारा आपल्या बिनधास्त आणि बोल्ड फोटोशूटनेही चांगलीच चर्चेत आली होती. आपल्या इन्स्टाग्रामवरुन बोल्ड फोटो शेअर करत तिने सर्वांनाच चकित केले होते.
भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजासोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवल्यानेही ती चर्चेत आली होती.
2006 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानातून साराने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरला सुरुवात केली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here