समंथा अक्किनेनी ही साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.समंथा तमिळ आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम करते.तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या तसेच तिच्या राहणीमानाबद्दलच्या सर्व गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या समंथाच्या सोशल मीडियावरील घराच्या फोटो आणि व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. समंथा तिचा पती आणि तेलुगू अभिनेता नागा चैतन्यसोबत हैद्राबादमध्ये एका आलिशान घरामध्ये राहते. या घरामध्ये स्विमिंग पूल आणि सर्व आधुनिक सुविधा असणारे किचन आहे. समंथाने तिच्या घराच्या अंगणात शेतीदेखील केली आहे. तिथे विविध प्रकारचे भाज्यांची आणि फळांची झाडे आहेत. तसेच समंथाने दोन कुत्रे देखील पाळले आहे. हॅश आणि ड्रोगो अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. समंथा लवकरच द फॅमिली मॅन सिझन-2 मध्ये दिसणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती वेब विश्वात पदार्पण करतेय.