वेगाने बदलत चाललेली जीवनशैली आणि धकाधकीचं आयुष्य याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. जीवनशैलीशी निगडित आरोग्य समस्यांमध्ये उच्च रक्तदाब ही सध्या एक महत्त्वाची समस्या आहे. अनेक जण हाय ब्लडप्रेशर किंवा लो ब्लडप्रेशरने त्रस्त आहेत. म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे पदार्थ कोणते ते पाहुयात. आहारात लिंबू, संत्री,मोसंबी अशा फळांचा समावेश केला पाहिजे. ज्या फळांमध्ये व्हिटामिन इ चं प्रमाण अधिक आहे त्या फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोबतच रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जपानमधील काही महिलांवर याविषयी एक अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार, लिंबू किंवा आम्ल असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे त्यांचा systolic blood pressure कमी झालं होतं. फॅटी फिशमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचं मुबलक प्रमाण असतं. जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसंच त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासोबतच पिस्त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. त्यामुळे आहारात पिस्त्याच्या आवर्जुन समावेश करावा.बेरीजकडे सुपरफूड म्हणूनही पाहिलं जातं. यात मोठ्या प्रमाणावर अॅटी ऑक्सिडेंटचं प्रमाण असतं. जांभळामध्ये अँथोसायनिन अॅटी ऑक्सिडेंट असतं जे रक्तातील नाइट्रिक ऑक्साइडची लेव्हल वाढवण्यास मदत करते व रक्तदाब नियंत्रणात ठेवते. त्यामुळे ब्लूबेरी, रसबेरी, चॉकबेरी, स्ट्रॉबेरी, जांभूळ यांचा आहारात समावेश करावा. कडधान्ये, धान्य यांच्यामध्ये फायबर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. तसंच रक्तदाबही नियंत्रणात राहतो. भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषण तत्वे असतात. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. या बियांमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि आर्जिनिन मोठ्या प्रमाणावर असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं गाजर रक्दाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही तितकंच महत्त्वाचं कार्य करतं. त्यामुळे सॅलेड, ज्यूस, सूप अशा विविध माध्यमातून गाजराचं सेवन करावं.