दापोली (रत्नागिरी) : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल मेहता यांनी केलेल्या एका ट्विट मूळे राज्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आठ महिने रखडलेला वेतनाचा प्रश्न निकाली निघाला असून राज्यातील सुमारे 1 हजार कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रखडलेले वेतन मिळाले आहे.
हेही वाचा– कुडाळमध्ये या 50 अनधिकृत बांधकामांना बसणार चाफ…
दापोली येथील डॉ.कुणाल मेहता यांनी राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर याना 26 जानेवारी रोजी ट्विट द्वारे राज्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुलै 2019 पासून वेतन मिळालेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.ट्विटरच्या माध्यमातून मांडलेल्या प्रश्नांची दखल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तत्परतेने दखल घेत त्यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन बडवे यांना तातडीने याकामी संबंधितांना आदेश देण्याच्या सूचना दिल्या. कार्यालयातून आदेश मिळाल्यानंतर डॉक्टर कुणाल मेहता यांच्यासह राज्यातील सर्व कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार आठ दिवसात मिळाले आहेत.
ट्विटची घेतली दखल
हेही वाचा– भडका उडाला आणि उध्वस्त झाले तिचे आयुष्य..
एवढ्यावरच न थांबता आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी ट्विट द्वारे डॉ. कुणाल मेहता यांचेशी संपर्क साधून वेतन मिळाले की नाही याबाबत चौकशी केली.यापूर्वीही डॉ. कुणाल मेहता यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट केल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मे व जून 19 चे वेतन मिळाले होते. डॉ. कुणाल मेहता यांनी माहिती देताना सांगितले की केवळ रत्नागिरी जिल्ह्यात 100 हुन अधिक कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. तर राज्यभरात 1 हजाराहून अधिक कंत्राटी वैद्यकीय अधिकारी असून त्यांचे रखडलेले वेतन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील साहेब यांनी घेतलेल्या पुढाकाराने मिळाले असून आपण ना. यड्रावकर साहेबांचे आभार मानतो.

News Story Feeds