जळगाव ः मध्य प्रदेश नैसर्गिक (Madhya Pradesh) संपन्न असा (Natural) प्रदेश असून येथे मोठ्या प्रमाणात (National Parks) वनसंपदा (Forest resources) देखील आहे. जंगलात फिरण्याचा आनंद घ्यायचा तर येथील डझन भर राष्ट्रीय उद्याने आहेत. जिथे भेट देवून तुम्ही निर्सगाच्या संन्निधात राहून भरपूर एन्जाॅय करू शकतात. चला तर जाणून घेवू मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यानांची माहिती..(madhya pradesh most famous natural forest national parks)

Also Read: धबधब्यांचा आनंद घ्यायचा तर मध्य प्रदेशात नक्की जा !

कान्हा नॅशनल पार्क

मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात कान्हा नॅशनल पार्क आहे. या उद्यानास राष्ट्रीय उद्यानाबरोबरच व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. हे उद्यान बंगालच्या वाघासाठीही प्रसिध्द आहे. कारण येथे त्यांचा अधिवास आणि जंगल सफारी करतांना त्यांचा दर्शन पर्यटकांना मिळते. 940 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 साली झाली. जीप चालविण्याकरिता हे पार्क प्रसिद्ध आहे. हे आशियातील एक उत्तम वन्यजीव अभयारण्य असल्याचे बोलले जाते.

बोरी वन्यजीव अभयारण्य

मध्य प्रदेशातील पंचमढी या ठिकाणी पर्यटकांचे खास आकर्षणाचे स्थळ आहे. यात एक म्हणजे येथील बोरी वन्यजीव अभयारण्य. या उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य निसर्गप्रेमींना पर्यटनासाठी खुणावत असतात. येथे वन्य जीव मोठ्या प्रमाणात असून यात जंगली डुक्कर, ब्लॅकबक, हायना, फॉक्स इत्यादी अनेक विलुप्त प्राणी पाहण्याची संधी आहे. पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षकांसाठीसुद्धा ही जागा नंदनवच आहे.

सातपुडा राष्ट्रीय उद्यान

हे भारतातील एक प्राचीन उद्यान असून येथे वेगवेळ्या वनस्पती आणि प्राणी दिसतात. २०२ चौरस मैलांपर्यंत पसरलेल्या या उद्यानात वाघ, हत्ती, काळे हरण इत्यादी अनेक प्राणी आहेत ज्यांना जवळून पाहण्याची संधी मिळते. निसर्गाच्या जवळ आणि जवळ असल्यामुळे सातपुडा राष्ट्रीय उद्यान कोणत्याही पर्यटकांसाठी नंदनवनपेक्षा कमी नाही.

Also Read: आशियातील सर्वात उंच गणपती मुर्ती कुठे आहे ? तर..घ्या जाणून !

पन्ना नॅशनल पार्क

मध्य प्रदेशातील छतरपुरातील पन्ना नॅशनल पार्क कोणत्याही पर्यटकांसाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. कारण हे बंगाल टायगरसाठी हा पार्क भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्यानांपैकी एक आहे. या उद्यानात 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. या उद्यानात बिबट्या, लांडगा, हायना, अस्वल, चित्ता इत्यादी प्राणी पाहण्यास मिळतात. तसेच जीप राइड, हत्तीची राइड आणि बोट राइड एकत्र या उद्यानात खूप लोकप्रिय क्रिया आहेत.

(madhya pradesh most famous natural forest national parks)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here