मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni नुकतीच विवाहबंधनात अडकली. १८ मे रोजी वाढदिवसानिमित्त सोनालीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. सोनालीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच तिच्या पतीविषयी आणि दुबईतील घराविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. याविषयी एका वृत्तवाहिनीच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना सोनालीने ट्विट केलं. (sonalee kulkarni tweeted about her house in dubai after marriage)

काय म्हणाली सोनाली?

एका वृत्तवाहिनीच्या बातमीत सोनालीच्या दुबईतील घराचं वर्णन राजमहाल असा केलं होतं. त्यावर सोनाली म्हणाली, ‘राजमहाल, आम्हीच पाहिला नाहिये अजून. काहीही सांगता राव, आमचा 2BHK फ्लॅट आहे, हो पण आम्ही सुखी, निरोगी आणि समाधानी आहोत, त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा महाल!’

Also Read: ‘हे आता मी खपवून घेणार नाही’; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

दुबईतील मंदिरात बांधली लग्नगाठ

सोनाली आणि कुणाल जुलै महिन्यात लग्न करणार होते. लग्नाची शॉपिंग करून सोनाली मार्च महिन्यात दुबईला गेली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट आणि एकंदर होणारा वायफळ खर्च लक्षात घेता दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. एका तासात शॉपिंग आणि चार जणांच्या साक्षीने १५ मिनिटांत हे लग्न उरकलं. ७ मे रोजी सोनाली आणि कुणाल विवाहबंधनात अडकले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here