बॉलिवूडमधल्या स्टार किड्सची नेहमीच चर्चा असते. यात मराठीतील स्टार किड्ससुद्धा मागे नाहीत. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर स्वानंदीचे बरेच फॉलोअर्स आहेत. स्वानंदीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आवडला आहे.बोगनवेलसोबत काढलेल्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. स्वानंदीने याआधीही ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बेर्डे कुटुंबातील १५ चुलत भावंडांमध्ये स्वानंदी एकुलती एक बहीण आहे. त्यामुळे घरात ती सर्वांची लाडकी असल्याचं, अभिनयने एका मुलाखतीत सांगितलं होतं.