अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करण्यात आले. पण आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला आहे की, प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? असाच प्रश्न ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सात बाराविषयी पडलेला होता आणि बहुतेकांना याची माहिती नाही. हे प्रॉपर्टी कार्ड नेमकं काय असतं किंवा ते कसं काढायचं याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा यांना व्यक्तीच्या मालकीच्या शेतजमीन तसेच स्थावर मालमत्ता यामध्ये घर, बंगला, आपण करत असलेल्या व्यवसायाची इमारत इत्यादींचा आरसाच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (How to get your property card)

काय आहे स्वामित्व योजना

स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशभरातील सगळ्या गावांचं ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या केलेल्या सर्वेक्षणाच्या द्वारे प्रत्येक गावातील घराचा नकाशा, व इतर प्रकारच्या मिळकत पत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. घराची मालकी आपलीच आहे व त्यावरील कायदेशीर अधिकार हा आपलाच आहे. त्या प्रॉपर्टीविषयी आपण काय करायचं याचा सर्वस्वी निर्णय हा तुमचा स्वतःचा राहणार आहे. यामध्ये सरकारला सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेता येता येणार नाही.

कसं मिळवणार प्रॉपर्टी कार्ड

प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सहाजिकच ऑनलाइन पद्धत आहे. आपण https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर संबंधित वेबसाईट शोधावी. वरती उल्लेख केलेली वेबसाईट हे महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट आहे. या साईटवर गेल्यानंतर उजवीकडे तुम्हाला digitally signed सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा असा पर्याय दिसेल. या पेजच टायटल DOWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD अशा पद्धतीचं टायटल या पेजवर असेल.

डिजिटल स्वाक्षरीच प्रॉपर्टी कार्ड कसे काढणार

सर्वप्रथम प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या पेजवर लॉगिन करायचे आहे. लॉग इन करण्यासाठी आपण सातबारा काढताना वापरलेले युजर नेम आणि पासवर्ड टाकू शकता. किंवा आपला फोन नंबरही टाकून आपण प्रॉपर्टी कार्ड पाहू शकतो.

Also Read: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

यासाठी ओटीपी बेस्ड लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतरचा कोलम हा इंटर मोबाईल नंबर त्याचा असतो या कॉलममध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर आलेला ओटीपी इंटर ओटीपी या पर्यायात टाकून व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करून तुमच्या समोर सातबारा या नावाचे एक पेज ओपन होते. त्या पेजवर रिचार्ज अकाउंट, पेमेंट हिस्टरी, पेमेंट स्टेटस, डिजिटली साईन प्रॉपर्टी कार्ड असे पर्याय दिसतात.

या सगळ्यात पर्यायांपैकी डिजिटली साईन प्रॉपर्टी कार्ड पर्याय तुम्हाला निवडावा लागतो. प्रॉपर्टी कार्डवरील पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागतो. त्यानंतर जिल्हा आणि मग तुमचं गाव किंवा तुमचे प्रॉपर्टी जात तहसील कार्यालया अंतर्गत येते ते कार्यालय निवडावे लागतात. त्यानंतर सीटीएस( सिटी सर्विस नंबर) नंबर टाकावा लागतो. तुमच्या प्रॉपर्टी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात. जर तुम्हाला सिटी सर्वे नंबर माहिती नसेल तर तुम्ही प्लॉट नंबर हे टाकू शकता. हे सगळं झाल्यानंतर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करून प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करता येते.

संपादन – विवेक मेतकर

How to get your property card

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here