सध्याच्या कोविड काळात आपली ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरज आहे. त्यामुळे आहारात तसा बदल करणंही आवश्यक आहे. यामध्येच आपल्या आजूबाजूला अशी काही झाडं आहेत, जे नैसर्गिक ऑक्सिजनचा स्त्रोत आहेत. ही झाडं कोणती ते पाहुयात.
पिंपळाचं झाड –
नैसर्गिक ऑक्सिजनचा स्त्रोत असलेलं पहिलं झाड म्हणजे पिंपळ. या झाडातून २४ तास ऑक्सिजन निर्मिती होत असते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीदेखील या झाडातून ऑक्सिजन मिळत असतो.
वडाचं झाड –
ऑक्सिजनचा सर्वात मोठा स्त्रोत असलेलं झाड म्हणजे वडाचं झाड. पूर्वीचे लोकदेखील वडाच्या झाडाखाली बसण्याचा सल्ला द्यायचे. हे झाड जितकं मोठं तितकी त्यातून ऑक्सिजन निर्मिती होत असते.
कडूनिंबाचं झाड –
औषधी गुणधर्म असलेलं हे झाड ऑक्सिजन निर्मिती करण्यासही मदत करतं. या झाडामुळे परिसरातील विषारी वायू किंवा बॅक्टेरिया नष्ट होतात.
अशोकाचं झाड –
लांब लांब पानं असलेलं हे झाड विस्तीर्ण नसलं तरी त्यातून ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे घराच्या परिसरात याचं एकतरी झाडं असावं.
जांभळाचं झाड –
जांभळाचं झाडं ऑक्सिजन निर्मिती करत असून हवेतील सल्फर ऑक्साइड आणि नायट्रोजन सारखे विषारी वायू शोषून घेतं.
अर्जुनाचं झाड –
या झाडाविषयी फार कमी जणांना माहित असेल. मात्र, वैद्यकीय आणि धार्मिकदृष्ट्या या झाडाला विशेष महत्त्व आहे. हे झाडं वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड व अन्य विषारी वायू रोखून त्यांचं रुपांतर ऑक्सिजनमध्ये करत असल्याचं म्हटलं जातं

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here