रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या 59 व्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत येथील “खल्वायन” संस्थानिर्मित डॉ. विद्याधर ओक लिखित व ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर जोशी दिग्दर्शित “संगीत ताजमहाल’ या नाटकाने वैयक्तिक दहा बक्षिसांसह नाट्य निर्मितीचा प्रथम क्रमांक पटकावला.
राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 16 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात झाली होती. अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक मुंबईच्या अमृत भारती या संस्थेच्या संगीत स्वयंवर, तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या आश्रय सेवा संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाने पटकावला.
अंतिम स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके अनुक्रमे ः दिग्दर्शन- मनोहर जोशी (ताजमहाल), नितीन जोशी (जय जय गौरीशंकर), नेपथ्य- सुरेंद्र वानखेडे (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष), सिद्धेश नेवसे (आपुलाची वाद आपणासी). नाट्यलेखन- डॉ. विद्याधर ओक (संगीत ताजमहाल), महादेव हरमलकर (म्हणे सोहिरा), संगीत दिग्दर्शन- डॉ. विद्याधर ओक (संगीत ताजमहाल), मयुरेश कस्त (म्हणे सोहिरा), संगीतसाथ ऑर्गन- वरद सोहनी (कट्यार काळजात घुसली), मधुसूदन लेले (संगीत ताजमहाल), संगीतसाथ तबला- हेरंब जोगळेकर (सं. ताजमहाल), प्रथमेश शहाणे (जय जय गौरीशंकर), संगीत गायन रौप्यपदक- दत्तगुरू केळकर (तुका आकाशा एवढा), अजिंक्य पोंक्षे (ताजमहाल), संपदा माने (स्वयंवर), गायत्री कुलकर्णी (मानापमान).
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- गुरुप्रसाद आचार्य (कट्यार काळजात घुसली), वामन जोग (ताजमहाल), सिद्धी बोंद्रे (मानापमान), निवेदिता चंद्रोजी (भाव तोची देव). गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- शारदा शेटकर (म्हणे सोयरा), स्मिता करंदीकर (ताजमहाल), संचिता जोशी (जय जय गौरी शंकर), गौरी जोशी (कट्यार काळजात घुसली), जान्हवी खडपकर (संशय कल्लोळ), वरद केळकर (ताजमहाल), स्वानंद बुसारी (कट्यार काळजात घुसली), विशारद गुरव (कट्यार काळजात घुसली), ओंकार प्रभुघारे (स्वयंवर), दशरथ नाईक (म्हणे सोहिरा)
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः प्राची सहस्रबुद्धे (स्वयंवर), सांची तेलंग (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष), मिताली मातोंडकर (तुका आकाशा एवढा), सुचित्रा गिरधर (आपुलाची वाद आपणासी), श्रुतिका कदम (जय जय गौरीशंकर), अभय मुळ्ये (जय जय गौरीशंकर), गिरीश जोशी (जय जय गौरीशंकर), विजय जोशी (ताजमहाल), सुनील जोशी (स्वयंवर), श्रेयस अतकर (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष) आदींनी यश मिळविले आहे. अंतिम फेरीत 23 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेचे बकुळ पंडित, योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदीप ओक आणि सुधीर ठाकूर यांनी परीक्षण केले.
संगीत तज्ज्ञ, लेखक, डॉ. विद्याधर ओक यांच्यासारख्या विद्वान माणसाने त्यांच्या लेखणीतून उतरलेले संगीत ताजमहाल हे नाटक “खल्वायन’ संस्थेला निर्मितीसाठी विश्वासाने सादर करण्यास दिले. दिग्दर्शक मनोहर जोशी यांनी तंतोतंत अभ्यास करून संहिता, संगीत, नेपथ्य, साथसंगत, कलाकार सहकारी यांचा योग्य मेळ जुळवून आणला. राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. ओक यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरला. निर्मितीसह प्रथम क्रमांक मिळणे याच्यासारखा दुसरा आनंद नाही.
– श्रीनिवास जोशी, खल्वायन, रत्नागिरी

News Story Feeds