
स्वयंपाक घरात जेवण बनवतातना जर तुमची भांडी काळी पडली असतील तर आपण त्यांना स्वच्छ करण्यासाठी कोल्ड्रिंक्स वापरू शकता. आदल्या रात्री आधी कोल्ड ड्रिंकने ते भांडे पूर्णपणे भरा आणि सकाळी ते नेहमीप्रमाणे स्वच्छ करा. तुमच्या लक्षात येईल की भांडी धुण्यासाठी देखील कोल्ड ड्रिंक वापरता येऊ शकते.

जर तुमच्या घरातील फळांच्या सभोवताली कीटक आणि माशा फिरत असतील तर त्यांना पळवून लावण्यासाठी आपण कोल्ड्रिंक वापरू शकता. यासाठी फळांच्या जवळ कोल्ड्रिंक्सने भरलेली एक छोटी वाटी ठेवा. कोल्डड्रिंक्सच्या गोड सुगंधामुळे मुंग्या आणि इतर कीटक त्याकडे आकर्षीत होतील.

जर तुमच्या बुटाच्या तळव्याला च्युइंगम चिकटला असेल तर ते सहजपणे निघत नाही अशा परिस्थितीत आपण कोल्ड ड्रिंकची मदत घेऊ शकता. त्या गम वर फक्त कोल्ड ड्रिंक घाला आणि ते सहज निघून जाईल.

केसांमध्ये च्युइंगम लागले असेल तर ते काढणे फार कठिण काम आहे. बऱ्याचदा तुम्हाला केस कापुन टाकावे लागू शकतात. पण या कामात कोल्ड ड्रिंक्स आपल्याला यात मदत करू शकते. आपल्याला फक्त ज्याला च्युइंगगम लागले आहे तो केसांचा भाग कोल्ड ड्रिंकमध्ये बुडवावा लागेल. तुमच्या केसांमधून च्युइंगगम सहजपणे निघून जाईल.

आपण आपला चष्मा साफ करण्यासाठी कापड वापरतो, पण कापड वापरल्याने धुळीचे कणांमुळे चष्म्याच्या काचांवर ओरखाडे पडतात. अशा वेळी कोल्ड्रिंक चांगले ग्लास क्लीनर म्हणून काम करू शकते. चष्मा साफ करण्यासाठी कोल्ड्रिंक फक्त चष्माच्या लेन्सवर ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवून टाका.

जर आपण काळ्या रंगाच्या कुठल्याही कोल्ड ड्रिंकमध्ये 1-2 तास फोटो बुडवून ठेवले तर फोटोंना व्हिंटेज इफेक्ट मिळेल. हा पध्दतीने फोटो ठेवल्यास आपण जून्या काळातील फोटो पहात असल्याचा इफेक्ट आपल्याला देता येईल.

तुमच्या बागेतील झाडांवर पडणाऱ्या वेगवेगळ्या रोगांवर कीटकनाशक म्हणून आपण कोका कोलाचा वापर करु शकता. मोठ्या वाटीत कोल्ड्रिंक ओतुन ती बागेत ठेवा आणि काही काळाने या वाटीत तुम्हाला बरेच कीटक मृत दिसतील.

जर एखाद्या धातूच्या वस्तूवर गंज चढला असेल तर तो काढण्यासाठी कोका-कोलाचा वापर केला जाऊ शकतो. आपण फक्त कोल्ड ड्रिंकमध्ये स्क्रबर बुडवा किंवा त्या वस्तूवर कोल्ड ड्रिंक टाका आणि स्क्रब करा.

घरात फरशीवर पडलेले तेलाचे डाग साफ करणे डोकेदुखी ठरु शकते. मात्र कोल्ड्रिंकचा वापर आपल्या घरातील फ्लोअरवर पडलेल हे तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. त्या डांगांवर थोड्या वेळेसाठी कोल्ड्रिंक टाका आणि मग हे डाग अगदी सहजतेने साफ होतात.

जर तुम्हाला नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर मग ती नाणी स्वच्छ ठेवण्यासाठी ती वेळेवेळी साफ करावी लागतात. अशा परिस्थितीत नाणी साफ करण्यासाठी, आपण आपल्या नाणी कोल्ड ड्रिंकमध्ये बुडवून ठेवा आणि थोड्या वेळाने नेहमीप्रमाने घासून स्वच्छ करा. ती अगदी चमकू लागतील.
Esakal