मुंबई – कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याच्या प्रभावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यत बॉलीवूडमधील सेलिब्रेटींना कोरोनानं ग्रासलं आहे. काहींचा उपचार घेताना मृत्युही झाला आहे. मात्र कोरोना हटण्याचे नाव घ्यायला तयार नाही. आता बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी शासनाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोठ्या पातळीवर मदत करण्याचे आश्वासन देऊन कोरोनाला हरवण्याचा निर्धारही केली आहे. कोरोना केवळ बॉलीवूडमध्येच आहे असे नाही तर दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतही कोरोना वेगानं वाढतो आहे. (actress Samyuktha Hegde Tested Covid 19 Positive Share Post On Instagram)

आता अभिनेत्री संयुक्ता हेगडे (Samyuktha Hegde ) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याविषयी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचे आई वडिल कोरोनानं संक्रमित असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संयुक्ताला कोरोना झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर ठरताना दिसत आहे. ज्येष्ठांपासून लहानांपर्यत सर्वजण त्याच्या विळख्यात अडकत चालले आहे.

samyukta hegde

संयुक्ता ( actress Samyuktha Hegde ) ही कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम कऱणारी प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. संयुक्तानं सोशल मीडियावर आपल्याला कोरोना झाल्याची माहिती शेअर केली आहे. यावेळी तिनं आपल्या आई – वडिलांच्या प्रकृतिविषयीही कल्पना दिली आहे. तिच्या फॅन्सन तिला लवकरात लवकर बरे होण्याचा सल्ला दिला आहे.

Also Read: “त्या घटनेनंतर कॅमेऱ्याचे फ्लॅश पाहिले तरी माझं रक्त खवळतं”

Also Read: भानुप्रताप ठाकूर, नाव तर ऐकलचं असेल?

इंस्टावर एक पोस्ट शेअर करताना संयुक्तानं ( actress Samyuktha Hegde ) लिहिल आहे की, मित्रांनो तुम्हा सगळ्यांना नमस्कार, मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण व्यवस्थित असाल. सध्या कोरोनाच्या काळात सर्वांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. शासनानं सांगितलेले कोरोनाचे नियम आपण सर्वांनी पाळायला हवेत. ते आपल्यासाठीच आहेत. सध्या मी आयसोलेटेड आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मी काळजी घेत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here