बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी जोडी म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( indian cricketer virat kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma). या दोघांनीही कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असण्यात दोघेही अग्रेसर असतात. देशातील सर्वाधिक चर्चेत असणारे सेलिब्रेटी म्हणूनही त्यांचा उल्लेख करता येईल. सध्या सोशल मीडियावर विराटची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं आपलेला अनुष्काचा आवडलेला चित्रपट आणि त्याच्यातील आवडत्या सीनविषयी सांगितलं आहे. (indian cricketer virat kohli revealed his favorite anushka film said i still see that)
विराटनं ( indian cricketer virat kohli ) आपल्याला अनुष्काचा कुठला चित्रपट आवडला आहे त्याविषयी सांगितले आहे. तसेच त्यात तो त्या सीनविषयी सांगतो की जो तो नेहमी पाहतो. त्याच्या मते तो त्याच्या आवडीचा सीन आहे. आपल्या हटके अभिनयासाठी अनुष्का प्रसिध्द आहे.
ऐ दिल है मुश्किल (e dil hai mushkil) हा विराटला अनुष्काचा आवडणारा चित्रपट आहे. तिनं त्या चित्रपटामध्ये जी भूमिका केली ती ही त्याला सर्वाधिक भावली आहे. त्य़ाविषयी तो सांगतो ज्यावेळी मी युट्युब चालू करतो तेव्हा त्यात कॅन्सरनं ग्रस्त असलेली अनुष्का दिसते. ऐ दिल है मुश्किल चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरची (ranbir kapoor) मुख्य भूमिका होती.
अनुष्काचं त्या भूमिकेसाठी मी खास कौतूक करतो. माझ्यामते ती तिची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका होती. ते गाणंही मला फार आवडते.
भारतीय क्रिकेट संघाविषयी सांगायचे झाल्यास येत्या २ जून पासून भारतीय संघ इंग्लडच्या दौ-यावर जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत न्युझीलंड सोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फाइनल खेळणार आहे.
काही दिवसांपूर्वी अनुष्कानं आपण कोरोनाच्या काळात लोकांना जी मदत केली आहे त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. सध्याच्या काळात सर्वांनी एकमेकांना आधार देण्याची गरज आहे हे तिनं सांगितलं होतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here