मुंबई: तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा भारतातील किनारीपट्टी लगतच्या राज्यांना बसला. महाराष्ट्रातील (Maharashtra) कोकण किनारपट्टीला (Konkan) या वादळाने झोडपून काढलं. वादळानंतर (Cyclone) राज्यातील महत्त्वाच्या नेतेमंडळींनी कोकणातील नुकसानीचा आढाव घेतला. भाजपच्या (BJP) महत्त्वाच्या नेत्यांनी कोकणात तीन दिवसांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यातील काही फोटो व्हायरल (Viral Photo) झाले. त्यातील एका फोटोवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना बूटांवरून (Shoes) खोचक टोला लगावला. (NCP Leader Nawab Malik Jokingly Trolls Devendra Fadnavis Pravin Darekar Shoes)

Also Read: “सातच्या आत घरात’च्या उदंड चर्चेनंतर…”; भाजपचा टोला

“कोकण दौऱ्यावर सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखी आश्चर्याची दुसरी गोष्ट नाही. तौक्ते वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते. यावेळी व्हायरल झालेल्या फोटोत दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसले. त्या दोन नेत्यांचे बूट ‘नायकी’चे होते की ‘पूमा’चे होते, हे माहिती नाही. पण नवीन बूट घ्यायची वेळ यावी ही बाब खूपच आश्चर्यकारक आहेत”, असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Fadnavis-Darekar-Shoes

“जगात पेट्रोलियमचे भाव कमी होत असताना मोदी सरकारकडून मात्र पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून हळूहळू लोकांचे खिसे कापायचा उद्योग सुरू आहे. देश आर्थिक संकट असताना नागरिक हैराण झालेत. उत्पन्नाचे स्रोत कमी होत चालले आहेत. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. तर काहींना अर्धा पगार मिळतोय. दुकानदारांना दुकान उघडता येत नाहीय. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र केंद्राकडून पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन लोकांना उघड लुटण्यात येत आहे”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here