बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानची मुलगी सुहाना खान तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच सुहानाने तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचा आज 21 वा वाढदिवस आहे. सुहानाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या बद्दल काही खास गोष्टी… २२ मे २००० रोजी मुंबईत सुहानाचा जन्म झाला. लहानपणापासूनच सुहानाला स्पोर्ट्सची आवड होती. शाळेत असताना बऱ्याच फूटबॉल स्पर्धांमध्ये सुहानाने भाग घेतला होता. फूटबॉलशिवाय तिला क्रिकेटचीही आवड आहे. त्यामुळे अनेकवेळा शाहरुखसोबत तिला IPL सामन्यांमध्ये पाहिलं गेलं आहे. सुहानाला डान्सचीदेखील खूप आवड आहे.मतिने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावरकडून डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. सुहानाने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर तिने लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे. सुहानाचं लेखनकौशल्यही चर्चेत असतं. राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कथा’ या स्पर्धेतही तिला पारितोषिक मिळालं होतं. अशा अनेक कला सुहानाने शिकल्या आहेत. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर सुहानाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.