ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’च्या The Family Man 2 दुसऱ्या भागाचा ट्रेलर १९ मे रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून युट्यूबवर या ट्रेलरने सर्व विक्रम मोडले आहेत. अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला युट्यूबवर 15 दशलक्ष लोकांनी पाहिले. ‘द फॅमिली मॅन 2’ने मिर्झापूर-2 च्या Mirzapur 2 ट्रेलरचे रेकोर्ड मोडले आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनच्या ट्रेलरला युट्यूबवर २४ तासांत 12 दशलक्ष लोकांनी पाहिले होते. (The Family Man 2 trailer gets 15 million views on YouTube beats Mirzapur for top spot)

‘द फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजचा ट्रेलर हा २४ तासांत भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर आहे. यावर अभिनेत्री समंथा अक्किनेनीने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी, सीमा बिस्वास, शरद केळकर, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, शहाब अली, श्रेया धन्वंतरी, महेक ठाकूर आणि वेदांत सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

The Family Man 2 trailer gets 15 million views

Also Read: मिलिंद सोमणचा सहजसोपा डाएट प्लॅन तुम्हीही करू शकता फॉलो

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे तो पुढे ढकलण्यात आला. येत्या ४ जून रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शक राज, डीके आणि सुपरन एस वर्मा यांनी केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here