बॉलिवूड चित्रपटांमध्ये काही परदेशी अभिनेत्रींनी आपलं नशिब आजमावलं. यापैकी काहींना यश मिळालं तर काही फक्त एक-दोन चित्रपटांपुरते प्रकाशझोतात आले. त्यापैकीच एक नाव म्हणजे बार्बरा मोरी Barbara Mori. बार्बराने हृतिक रोशनच्या Hrithik Roshan ‘काइट्स’ Kites या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात हृतिक आणि बार्बरासोबत कंगना राणावतनेही काम केलं होतं. ‘काइट्स’ या चित्रपटानंतर बार्बरा बॉलिवूडपासून दूरच गेली. ती सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी मेक्सिकन चित्रपटांमध्ये तिची फार चर्चा असते. बार्बराने १९९६ मध्ये सर्जिओ मेयरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांना एक मुलगा आहे. बार्बराच्या मुलालाही एक मुलगी आहे. त्यामुळे वयाच्या ३९ व्या वर्षीच बार्बरा आजी झाली. तिच्या नातीचं नाव मिला आहे. २०१६ मध्ये मिलाचा जन्म झाला. त्यावेळी बार्बरा ३९ वर्षांची होती. आता ती ४३ वर्षांची आहे. पहिल्या रिलेशनशिपमधून विभक्त झाल्यानंतर बार्बराने २०१६ मध्ये बास्केटबॉल खेळाडू केनिथ रे सिग्मनशी लग्न केलं. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. २०१७ मध्येच या दोघांनी घटस्फोट घेतला.