विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध दरवळतो आहे.

पंढरपूर (सोलापूर) : मोहिनी भागवत एकादशी (mohini bhagwat ekadashi) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (vitthal rukmini temple) रंगीबेरंगी फुलांची (colorful flowers) आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध दरवळतो आहे. (On the occasion of mohini bhagwat ekadashi, colorful flowers have been decorated in vitthal rukmini temple)

Also Read: पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजेनिमित्त फुलांची सजावट

जिकडे पहावे तिकडे फुलांच्या माळा दिसत आहेत. पुणे येथील श्री विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने आराशीसाठी वापरलेली झेंडू, मोगरा, गुलाब, आष्टर अशी अनेक प्रकारची सुमारे ऐंशी हजार रुपये किंमतीची तीनशे किलो फुले देण्यात आली आहेत. कुमार शिंदे, फ्लाॅवर डेकोरेटर पुणे य़ांनी मंदिरातील हे डेकोरेशन केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिरातील नित्योपचार नेहमीप्रमाणे सुरू आहेत.

(On the occasion of mohini bhagwat ekadashi, colorful flowers have been decorated in vitthal rukmini temple)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here