सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रिया वाटत असतं. त्यामुळे अनादी काळापासून स्त्रिया त्यांच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देत आलेल्या आहेत. एकेकाळी सुंदर दिसण्यासाठी मेकअप केला जात होता. मात्र, आताच्या काळात गरज म्हणून मेकअप केला जातो.
मेकअप केल्यामुळे केवळ आपलं बाह्यसौंदर्यंच खुलून दिसतं असं नाही. तर, आपला आत्मविश्वासही द्विगुणित होतो असं म्हटलं जातं. व्यक्तीमत्त्व खुलून दिसण्यासाठी अनेक जणी दैनंदिन जीवनातही हलकासा मेकअप करतात. परंतु, मेकअप करतांना काही बेसिक गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.
दररोजच्या घाईगडबडीत पटकन अगदी १५ मिनिटांमध्ये मेकअप कसा करावा ते जाणून घेऊयात.
मेकअप करण्यापूर्वी –
मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावून चेहरा मॉइश्चराईज करा. व चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन लावा.
मेकअप बेस –
चेहऱ्याचा संपूर्ण मेकअप हा बेसवर अवलंबून असतो. जर मेकअप बेस व्यवस्थित बसला तर मेकअप छान होतो. त्यामुळे चेहऱ्यावर बीबी -सीसी क्रीम किंवा फाऊंडेशन लावा.
कंन्सिलरचा वापर –
मेकअप बेस लावून झाल्यानंतर चेहऱ्यावर कंन्सिलर लावा. डोळ्याखाली कंन्सिलर लावल्यामुळे काळी वर्तुळं झाकली जातात.
कॉम्पॅक्ट पावडर व ब्लशर –

चेहऱ्यावर मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर लावा. त्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही. नंतर गालांना गुलाबी लूक देण्यासाठी ब्लशरचा वापर अवश्य करा.

आय लायनर –
डोळे उठावदार दिसण्यासाठी डोळ्यांना आय लायनर, मस्कारा व आयशॅडोज वापरा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here