मुंबई – कोरोनानं आता सर्वांना काळजीत टाकलं आहे. त्याचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना आधार देण्यासाठी बॉलीवूडचे सेलिब्रेटी मैदानात उतरले आहे. त्यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही केले आहे. काही सेलिब्रेटींच्या घरात कोरानानं शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty ) कोरोना (corona) झाला होता. केवळ तिलाच नाही तर तिच्या संपूर्ण फॅमिलीली कोरोनाची लागण झाली होती.(shilpa shetty home sanitised after her family recovers from covid)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (post share on social media) एक पोस्ट शेअऱ केली होती. त्यात तिनं आपल्या फॅंमिलीला झालेल्या कोरोनाविषयी माहिती दिली होती. त्यावेळी तिनं आपण त्यांची कशाप्रकारे काळजी घेतो हे तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. कोरोनाच्या दरम्यान कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा हे ही शिल्पानं यावेळी सांगितलं होतं. तिच्या या पोस्टला सर्वांची पसंती मिळाली होती. आताही तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

shilpa shetty house

शिल्पाची पूर्ण फॅमिली कोरोनाबाधित झाली होती. मात्र त्या प्रसंगाला तिनं मोठ्या धैर्यानं तोंड दिल होतं. आता तिची फॅंमिली कोरोनातून बाहेर आली आहे. मात्र तिला तेव्हा आपलं संपूर्ण घर सॅनिटाईज करावं लागलं होतं. याची माहिती तिनं सोशल मीडियावरुन व्हायरल केली आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सर्वाधिक काळ अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे.

Also Read: तेजस्विनीचं वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गिफ्ट

Also Read: ‘कोरोनाचं भान ठेवा, फोटोशुट कसलं करताय, संवेदनशील व्हा’

शिल्पाच्या त्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती तिचं घर सॅनिटाईज (sanitisation) करताना दिसत आहेत. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये शिल्पानं लिहिलं आहे की, कोविडमधून बाहेर आल्यानंतर संपूर्ण घराचे सॅनिटायझेशन केले आहे. तिच्या त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. चाहत्यांनी त्या व्हिडिओला पसंत केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून आपण मोठया संकटाशी झुंजत होतो. अखेर त्यातून बाहेर आल्याचे समाधान तिनं व्यक्त केलं आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here