अभिनेत्री रिचा चड्ढा Richa Chadha आणि अभिनेता अली फजल Ali Fazal यांनी गुपचूप लग्न केलं की काय, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहेत. यामागचं कारण म्हणजे अली फजलने पोस्ट केलेला फोटो. अलीने मेहंदी लावलेल्या हाताचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. या फोटोमध्ये रिचाचा चेहरा जरी दिसत नसला तरी कपड्यांच्या पॅटर्नवरून मेहंदीचा हात तिचाच असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. रिचाने त्याच पॅटर्नचा दुपट्टा परिधान केलेला फोटो शुक्रवारी तिच्या अकाऊंटवर पोस्ट केला होता. (Ali Fazal and Richa Chadha fuel wedding rumours with mehendi photo)

‘मोहब्बत, डुडल मेहंदी’, असं कॅप्शन अलीने या फोटोला दिलं होतं. या फोटोवर अनेकांनी दोघांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. इशा गुप्ता, अमायरा दस्तुर यांसारख्या सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या सर्व कमेंट्स आणि चर्चांनंतर अलीने सोशल मीडियावरून तो फोटो डिलिट केला.

Also Read: चंद्रचूडचा अंगावर काटा आणणारा अनुभव; “त्या अपघातामुळे माझं करिअर संपलं”

गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले रिचा आणि अली एप्रिल २०२० मध्ये लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउन यांमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. ‘सर्वांचं आयुष्यचं पुढे ढकललं गेलंय, त्यात लग्नाचं काय बोलणार आता? या परिस्थितीतून आपण शिकायला हवं आणि आवश्यक ते बदल करायला हवे’, असं अली एका मुलाखतीत म्हणाला होता.

अली आणि रिचाने ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ या दोन्ही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही हे दोघं झळकणार आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here