नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव (break the chain) रोखण्यासाठी ( lockdown release) जिल्‍हा प्रशासनाने गेल्‍या दहा दिवसांपासून लागू केलेले कठोर निर्बंध सोमवार (ता.२४) पासून काही अंशी शिथिल झाले. त्‍यातच नाशिककरांनी बाजारपेठांमध्ये (nashik market) खरेदीसाठी मोठी गर्दी (crowd) केल्‍याचे दृष्य सकाळपासून बघायला मिळत आहे.

(सर्व फोटो – केशव मते)

nashik crowd (फोटो – केशव मते)
nashik crowd (फोटो – केशव मते)

निर्बंध शिथिल होताच नाशिककरांची खरेदीसाठी गर्दी

राज्‍यासह नाशिक जिल्‍ह्‍यातही एप्रिल महिन्‍यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभुमीवर गेल्‍या १२ मेपासून जिल्‍हा प्रशासनाने कठोर निर्बंध अवलंबले होते. याअंतर्गत केवळ अत्‍यावश्‍यक वस्‍तु व सेवांशी निगडीत व्‍यवसाय सुरु ठेवले होते. तर जीवनावश्‍यक वस्‍तू व सेवांची ऑनलाइन सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. काल (ता.२३) पर्यंत निर्बंध लागू असल्‍याने सोमवारी (ता.२४) राज्‍य शासनाच्‍या ब्रेक द चेनअंतर्गत जारी केलेले निर्बंध लागू राहाणार आहेत. त्‍यानुसार जीवनाश्‍यक वस्‍तूंमध्ये समावेश असलेले किराणा दुकान सकाळी सातपासून सुरु झाले होते. यातून नागरीकांनी खरेदीसाठी गर्दी केली. त्‍यामूळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्‍या रविवार कारंजा, अशोकस्‍तंभ, रविवार पेठ परीसरासह उपनगरीय भागांमध्येही किराणा दुकानांबाहेर ग्राहकांच्‍या रांगा लागल्‍याचे चित्र होते. दुसरीकडे शहर परीसरातील रस्‍त्‍यांवरील रहदारीदेखील वाढलेली होती.

nashik crowd (फोटो – केशव मते)

Also Read: नाशिकच्या व्ही. एन. नाईक संस्थेत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

nashik crowd (फोटो – केशव मते)

Also Read: शिवसेना नगरसेवक पुत्राविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here