
ऐतिहासिक जे अविस्मरणीय ठिकाणांमध्ये ‘हम्पी’ चा समावेश होतो. आपल्या पुरातत्व वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतील. तुम्हाला जर ऑफबीट प्लॅनिंग हवी असेल तर हे ठिकाण नक्की निवडा

जर तुम्ही एका वेगळ्या रोमांचक ठिकाणच्या शोधात असाल तर तुम्ही ताज फालकनुमा पॅलेस बुक करू शकता आणि या ठिकाणी असलेल्या भव्यतेचा अनुभव घेऊ शकता. एकेकाळी हैदराबादच्या निजामाचे असलेले हे निवासस्थान आता एका मोठ्या हॉटेलमध्ये परिवर्तित झाले आहे.

दार्जिलिंग ही देशातील चहा उत्पादित करणार्यां ठिकाणांपैकी प्रमुख ठिकाण आहे. निसर्गाचा अद्भूत नजारा आणि चहाच्या बागा आणि इथले रिसॉर्ट सुट्टीसाठी विशेष आकर्षण आहे.

वसंत ऋतूच्या अगदी सुरुवातीला काश्मीरमध्ये सगळीकडे हिरवागार गालीचा असतो. नजर जाते त्या ठिकाणाप्रयंत सर्व भाग निसर्गसंपन्न दिसतो. त्यात ट्यूलिप फुलांचा बहार येतो त्या हंगामात विलोभनीय दृश्य पहावयास मिळते. हा सुंदर नजारा तुम्ही एप्रिल महिन्यापूर्वी पाहू शकता.

अनेक बाईक रायडर्स पर्यटनासाठी लडाखला पसंती देतात.रायसी फोर्ट, रॉयल पॅलेस, प्यांग, लिकिर, स्पिटुक, थिक्से अशा मॉनेस्ट्रीज (मठ) येथे आहेत. हे प्राचीन बौद्ध मठ पाहताना एका गूढ विश्वात आपण जातो. या ठिकाणी सूर्यास्त वेळी सुंदर दिसणारा क्षण तुम्हाला फोटो मध्ये टिपता येईल.

हनिमूनसाठी केरळ देखील एक भारी ठिकाण आहे. कोची पासून चित्तूर, कोट्टायम बोट फेरी हे याठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. इथल्या बॅकवॉटरला गेलात तर सुंदर क्षण अनुभवायला मिळेल.

अंदमान आणि निकोबार बेटे ही शांत जागा, रोमॅंटिक वातावरण, उत्कृष्ट हॉटेल्स, आणि बरेचसे साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टी अंदमान आणि निकोबारला एक उत्तम हनिमून स्थळ बनवतात. सी फूड खवय्यांसाठी देखील ही एक उत्तम जागा आहे

जर तुम्हाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या
पर्यटन स्थळे पाहायची असतील. तर राजस्थान मधील जोधपूर, उदयपूर, चित्तौडगड, रणथंबोर आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटू शकता. तसेच गुजरातमध्ये नॅशनल पार्क आहे. जिथे जंगल सफारी सोबत तुम्ही भटकंतीला जाऊ शकता.
Esakal