अंजीर हे फळ काही लोकांनी बघितलं असेल. अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. जाणून घेऊयात अंजीरचे काही रहस्यमय फायदे.

ऍनिमियापासून अंजीर करते संरक्षण :

जेंव्हा शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमी होते, तेंव्हा ऍनिमिया होतो. मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.

दम्यापासून सुटका:

अंजीरमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांमुळे शरीरात कफ कमी होतो. याचसोबत दम्यापासून देखील अंजीर आपलं संरक्षण करतो.

ब्लडप्रेशर पासून मुक्तता:

अंजीरमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबरमुळे ब्लडप्रेशर कंट्रोल ठेवण्यात मदत होते.

हाडांसाठीही फायद्याचं:

अंजीरमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी :

अंजीरमध्ये सोल्यूबल फायबरचे प्रमाण अधिक ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते. तसंच फायबरमुळे पचन क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून नाहीसं होतं.

डायबीटीज नियंत्रणात उपयुक्त :

अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे डायबीटीज कंट्रोल करण्यात मदत होते.

पचन क्षमता वाढण्यास मदत:

अंजीरमध्ये असलेल्या डायट्री फायबरमुळे पचन क्षमता वाढण्यासाठी मदत होते. तसंच सतत अपचनाच्या समस्यांपासून अंजीर मानवी शरीराला सुरक्षित ठेवते.

हृदयासाठी उपयुक्त :

अंजीर खाल्ल्यामुळे हृदयाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला संपवण्यासाठी अंजीरमध्ये आसलेले अँटिऑक्सिडंट मदत करतात. अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतं ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here