आपल्या लग्नासाठी आपल्याला मांग टीका डिझाइन आवडत असेल, तर आपण येथे दर्शविलेल्या काही डिझाइनमधून प्रेरणा घेऊ शकता.
शुद्ध सोन्याची मांग टीका : जर आपण आपल्या खास दिवसासाठी कांजीवरम साडी नेसली असेल, तर त्यावर शुद्ध सोन्याची मांग टीका खूप सुंदर दिसेल. आजकाल कोणत्याही ब्रॅंन्डेड पोशाखावर शुद्ध सोन्याची मांग टीका ही एक ट्रेंड बनली आहे.
ओवर साइज्ड मांग टीका : जर आपल्याला प्रभावी वधूचा देखावा हवा असेल, तर आपण गोल किंवा अंडाकृती आकारात ही डिझाइन कपाळावरती वापरु शकता. ही डिझाइन खडे (हिरे), क्रिस्टल आणि हिऱ्यांनी बनवली असून वधूला एक परिपूर्ण लूक देऊ शकते.
चांद बाली मांग टीका : या डिझाइनला बाजारपेठेत सर्वाधिक मागणी नसली, तरी नववधूंत हीच डिझाइन खूप फेमस आहे. वधूला नेचरल सौंदर्य देण्याबरोबरच तिला सुंदर बनवण्यात या डिझाइनचा खूप वाटा आहे.
मल्टी लेयर साइड टीका : ही डिझाइन फारशी लोकप्रिय नसली, तरी याची खूबसुरती नववधूला चांगलीच भावते. कारण डिझाइनमध्ये सुंदर अलंकारासोबतच एक वेगळी झलक पहायला मिळते. ही डिझाइन केसांच्या बाजूने अधिक सुंदर दिसते.
पासा मांग टीका : वधूचे सौंदर्य खुलवण्याकरिता डोक्याच्या डाव्या बाजूला घालण्यासाठी एक सुंदर मांग टीकेची डिझाइन बनवली आहे. त्यातील कुंदन वर्क आणि घुंगरूंनी तिचे सौंदर्य आणखी खुलण्यास मदत होते. सध्या नववधूंकडून या प्रकारच्या डिझाइनला चांगली पसंती आहे.
मल्टी लेयर मांग टीका : आपल्याला अधिक मोहक दिसण्यासाठी आपण या मल्टी-लेयर मांग टीकेची निवड करु शकता. ही डिझाइन आपले डोके आणि केस पूर्णपणे लपवू शकते. एक सुंदर वधू दिसण्यासाठी आपण कुंदन वर्क किंवा मोती वाला मांग टीका घालू शकता.
वन टियर मांग टीका : या टीक्यामध्ये एक सुंदर डिझाइन बनवली गेली आहे. जी वधूचं सौंदर्य आणखी खुलवू शकते. याच्या मध्यभागी एक सुंदर डिझाइन असल्याने वधूचं मनमोहक रुप सजून जाण्यास मदत होते.
बोरला मांग टीका (Maang Tikka) : या डिझाइनमध्ये प्रामुख्याने हरियाणा आणि राजस्थानमधील कथन शैली दर्शविली आहे. जुन्या प्राचीन काळात राणी देखील हीच डिझाइन वापरत असत. यामध्ये मोती आणि मौल्यवान खड्यांनी (हिरे) भरलेलं एक सुंदर डिझाइन आहे, जे आपल्याला एक शाही वधूचे परिपूर्ण सौंदर्य देऊ शकते.
मोत्याची मांग टीका : ही डिझाइन सुंदर रत्नांनी मडवली असून नाईट पार्टीत या मांग टीकेचा मोठा वापर होतो. ही डिझाइन वधूला सुंदर दिसण्यासाठी मदत करते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here