सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अश्रु ढाळत आहे. असे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर त्यावर काहींनी टीका करण्यास सुरुवातही केली. ट्रोलर्सनं मोदींना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. अशावेळी बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगणा (bollywood actress kangana ranaut ) ही मोदींच्या समर्थनार्थ समोर आली आहे. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींना सपोर्ट केला आहे. जे कुणी मोदींवर टीका करत असतील त्यांनी एकदा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे असे तिनं म्हटलं आहे.

वाराणसीमध्ये मोदींनी फ्रंटलाईन वर्कर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशी कोरोनावर चर्चा केली. त्यावेळी ते कमालीचे भावूक झाले होते. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते. त्यांचे भावनाशील होणं अनेकांना खोटेपणाचं वाटलं हे सोशल मी़डियावरील प्रतिक्रियेतून दिसून आले. त्यानंतर त्यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली.
Also Read: TVF Aspirants च्या निर्मात्यांवर वर चोरीचा आरोप
Also Read: ‘द फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनवर आणा बंदी’
कंगणानं (kangana ranaut angry making fun of ) आपल्या इंस्टाग्रामवरुन मोदी यांची पाठराखण केली आहे. तिनं लिहिलं आहे की, त्यांचं रडणं खरं होतं की खोटं हे तुम्ही लाय डिटेक्टर वापरुन तपासू शकता. ते कमालीचे भावूक झाले होते. हे आपण मान्य करायला हवे. दुस-यांच्या वेदनांचा विचार करणारा माणून अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त करु शकतो रे मला सांगायला हवे. मी पंतप्रधानांच्या विचारांशी सहमत असल्याचे कंगणानं यावेळी सांगितले आहे.
Esakal