मुंबई – योगगुरु रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी अॅलोपॅथीवर परख़ड मत व्यक्त केले आणि त्यांच्यावर देशातील डॉक्टरांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यात देशाचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनाही आपले मत मांडावे लागले. त्यांनी रामदेव बाबांना आपलं वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. आयएमए (इंडियन मेडिकल असोशिएशन) ने आक्रमक धोरण स्विकारुन रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यासगळ्या प्रकरणावरुन सोशल मीडियावर रामदेव बाबा यांच्यावर जोरदार टीका होत असल्याचे दिसुन आले आहे. (marathi movie director kedar shinde share post of yogguru ramdev baba on social media)
सध्या मराठी नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी (marathi movie director kedar shinde ) त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन रामदेव बाबा यांच्यावर एक मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यांनी बाबा रामदेव (yogguru ramdev baba ) यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी म्हटले आहे की, या देशाचं कठीण आहे बाबा, आपले सर्वोत्कृष्ट अभिनेते अश्रूंची फुले कधी उधळणार? अशा शब्दांत त्यांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या या पोस्टवरुन अनेकांनी त्यांना कमेंट दिल्या आहेत. काही युझर्सनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाब्दिक चिमटे काढले आहेत. शिंदे यांची ती पोस्ट व्हायरल झाली आहे.

योगगुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. त्यावरून बराच गोंधळ उडाला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक होत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. (After HM Harsh Vardhan’s letter Baba Ramdev apologizes for remarks allopathy medicines)आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रामदेवबाबा यांनी पत्र लिहून आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअॅपवर आलेले फॉरवर्ड मेसेज वाचून मी अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असं म्हणालो होतो, हे विधान मागे घेत आहे, असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे. आम्ही आधुनिक चिकित्सा विज्ञानमध्ये अॅलोपॅथीचे विरोधी नाही आहोत. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.
Also Read: Teaser: आतुरता संपली; ‘मनी हाईस्ट’च्या पाचव्या सीझनची तारीख जाहीर
Also Read: पेशंटचा जीव वाचवता आला नाही, ‘हेल्पलेस’ झालोय…
सोशल मीडियामध्ये रामदेवबाबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते अॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधात बोलताना दिसले. कोरोना महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा रामदेव बाबांनी सोमवारी रात्री उशिरा व्टिट केले होते. त्यात त्यांनी डॉक्टरांना काही प्रश्न विचारले होते. त्यांचे ते व्टिटही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
Esakal