पुणे – जिल्ह्याच्या पश्‍चिम भागा पाठोपाठ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) (MSRDC) पूर्व भागातील रिंगरोडची (Ringroad) मोजणी (Survey) व भूसंपादन (Land Acquisition) करण्यास राज्य सरकारने (State Government) नुकतीच मान्यता (Permission) दिली. त्यामुळे आता पूर्व भागात या प्रकल्पासाठी जागा मोजणीचे काम पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. रिंगरोड मार्गी लागण्यासाठी यातून एक पाऊल पुढे पडल्याचे मानले जात आहे. (Ring Road in Pune will Pass Through this Village District)

Ringroad

खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे १०३ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात या मार्गाच्या मोजणीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ आता पूर्व भागातही रिंगरोडच्या मोजणीस सरकारने मान्यता दिली आहे.

पुणे सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रूक येथून हा मार्ग सुरू होणार असून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से येथे येऊन तो मिळणार आहे.

Also Read: पुणे महापालिकेचे लसीकरण उद्या मंगळवारी राहणार बंद

असा असेल पूर्व भागातील मार्ग

  • पुणे-मुंबई द्रुतगती, नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणार

  • मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतील ४६ गावांतून जाणार

  • सहा पदरी महामार्गावर एकूण ७ बोगदे, ७ अंडरपास, दोन नद्या आणि दोन रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी पूल

मार्गाची वैशिष्ठे

  • लांबी १०३ किमी.

  • रुंदी ११० मी.

  • भूसंपादन ८५९.८८ हे.

  • भूसंपादनासाठी अंदाजे खर्च १४३४ कोटी रुपये

  • एकूण खर्च ४,७१३ कोटी

रिंगरोड दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पश्‍चिम भागात जमीन मोजणीचे काम सुरू झाले आहे. आता पूर्व भागातील रिंगरोडसाठी लागणाऱ्या जमिनींच्या मोजणीसाठी मान्यता मिळाली असून जून महिन्यात हे काम सुरू होईल.

– संदीप पाटील, उपविभागीय अभियंता, एमएसआरडीसी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here