‘जो जीता वही सिकंदर’ (Jo Jeeta Wohi Sikandar) आणि ‘दलाल’ (Dalal) यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारणारी आयशा जुल्का (Ayesha Jhulka) बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्री! बऱ्याच वर्षांपूर्वी बॉलिवूडचं करिअर सोडून एक बिझनेस वूमन बनलेली आयशा तिच्या बॉलिवूड (Bollywood) कारकिर्दीत अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि मिथुन चक्रवर्ती (Akshay Kumar Nana Patekar and Mithun Chakraborty) यांच्यासोबत असलेल्या अफेयरसाठी ती चर्चेत राहिली.
आपल्या पुढील करिअरसाठी आयशानं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला अन् लग्नानंतर आयशानं स्पा उघडला आणि त्याच व्यवसायात तिनं आपलं करिअर सुरु केलं. 1983 मध्ये ‘कैसे-कैसे लोग’ या चित्रपटाद्वारे तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि या चित्रपटानं तिला बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख मिळवून दिली. आयशानं 1991 साली आपला पहिला हिट चित्रपट दिला. यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. आयशा एकापाठोपाठ एक हिट फिल्म्स देत गेली आणि ती दिग्दर्शकांची पहिली पसंत ठरली.
1992 मध्ये आयशानं ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आमिर खानसोबत (Aamir Khan) काम केलं. या चित्रपटानं तिची कारकीर्द मोठ्या शिखरावर नेऊन ठेवली. पण, तुम्हाला माहिती आहे? आयशा ही या चित्रपटासाठी पहिली पसंत नव्हती. तिच्याऐवजी या चित्रपटासाठी दक्षिण भारतीय अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती.
एका वृत्तानुसार, ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटासाठी आयशा जुल्का मेकर्सची पहिली पसंत नव्हती. या चित्रपटात साउथ इंडियन इंडस्ट्रीची अभिनेत्री गिरिजा शेट्टारला (Actress Girija Shettar) आयशासमोर कास्ट करण्यात आलं होतं. गिरिजानं चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली होती. पण, गिरिजाच्या काही जुन्या कमिटमेंट्समुळे चित्रपटाचं शुटिंग खूप उशीरापर्यंत चालायचं, या कारणामुळं गिरिजाची जागा आयशा जुल्का यांनी या चित्रपटात घेतली.
मात्र, त्यानंतरही या चित्रपटात गिरिजाला कास्ट केलं होतं. वास्तविक, गिरिजासोबत ‘अरे यारों मेरे प्यारों’ या चित्रपटाच्या एका गाण्याचं चित्रीकरणही करण्यात आलं होतं. पण, गिरिजानं हा चित्रपट सोडल्यानंतर आयशा जुल्काबरोबर पुन्हा हे गाणे चित्रित झालं नाही आणि निर्मात्यांनी हेच गाणं गिरिजासोबत चित्रपटात कायम ठेवलं.
या चित्रपटात आमिर खान आणि आयशा जुल्का मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातलं ‘पहला नशा’ गाणं आजही लोकांना वेड लावत आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो फक्त मुंबईतच चालला, परंतु या चित्रपटाची जादू देशाच्या इतर कोणत्याही भागात चालली नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here