सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे जीम, योगा सेंटर सारं काही बंद आहे. त्यामुळे फिटनेस फ्रिक लोकांना सध्या घरीच राहून त्याच्या फिटनेसकडे लक्ष द्यावं लागत आहे. यामध्येच घरी राहून फिटनेस कसा जपावा ते शौमा मेनन यांनी सांगितलं आहे ते पाहुयात. फिट राहायचं असेल तर प्रत्येक व्यायाम प्रकार हा योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यामुळे घरी जरी व्यायाम करत असाल तर डंबेल्सच्या मदतीने व्यायाम करावा. तुमच्या वर्कआउटचे वेळापत्रक डायरीत लिहून ठेवा. व्यायाम करताना आरशामध्ये स्वतःला न्याहाळा. तुमची प्रगतीच तुमची प्रेरणा बनेल. शक्यतो व्यायामाचं वेळपत्रक चुकवू नका आणि व्यायामाचा कंटाळा करु नका. वर्कआऊट करण्याची योग्य वेळ ठरवून घ्या व त्यानुसारच दररोज व्यायाम करा. व्यायाम करताना तुमच्या आवडीची गाणी ऐका म्हणजे व्यायाम करतांना उत्साह वाढेल. सध्याच्या काळात घराबाहेर जाऊन जॉगिंग करणं शक्य नसल्यामुळे घरीच टेरेस किंवा घरात धावा.