मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिध्द कॉमेडी सिरियल तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak mehata ka ulta chasma) या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्तानं (Munmun datta) एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिनं एक जातीय विधान केलं होतं. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. ट्रोलर्सकडून ती ट्रोलही झाली होती. आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. तिनंही जातीयवादी विधान केल्यानं तिला अटक करण्याची मागणी ट्रोलर्सनं केली आहे. अखेर तिला आपल्या वक्तव्यावरुन माफी मागावी लागली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव युविका चौधरी (actress yuvika Choudhary ) असे आहे. (actress yuvika Choudhary Uses Casteist Slur In A Video After Arrest She Issues Apology)

युविकानं (actress yuvika Choudhary ) सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिनं एक जातीवाचक शब्द वापरला होता. त्यामुळे तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. तिनं जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात दिसून येते की, ती आपल्या पतीकडून हेअर कटिंग करुन घेते आहे. तेव्हा युविका आपला फोन घेऊन येते. आणि आपला एक व्हिड़िओ तयार करु लागते. ज्यावेळी मी व्होग तयार करते तेव्हा मला मेकअपला फारसा वेळ मिळत नाही. त्यावेळी ती एक जातीवाचक शब्दांचा वापर करते. जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली.

actress yuvika chaudhari

युविका जे बोलली ते चूकीचे असून तिला अटक करावी अशी मागणी नेटक-यांनी केली आहे. आपल्या बोलण्यामुळे ज्यापध्दतीनं समाजात पडसाद उमटले त्यावरुन युविकानं माफी मागितली आहे. अखेर तिनं पुन्हा व्टिट करुन आपली चूक कबूल केली आहे. त्या व्टिटमध्ये ती म्हणते, मित्रांनो नमस्कार, मी जो शब्द वापरला त्याचा अर्थ मला माहिती नव्हता. त्यामुळे मी तुमची माफी मागते. मला कुणालाही दुखवायचे नव्हते. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. अशा शब्दांत युविकानं आपला माफीनामा पोस्ट केला आहे.

Also Read: कोरोनानं हाल केलेत, जवळ पैसा नाही, प्रसिध्द गायिकेची पोस्ट

Also Read: ‘राधे’ ची पायरसी करणाऱ्यांचे Whats App बंद करा; उच्च न्यायालय

युविकाविषयी अधिक सांगायचे झाल्यास तिनं ओम शांती ओम (Om shanti Om) मध्ये डॉली अरोराची भूमिका केली होती. याशिवाय काही मालिकांमध्येही तिनं काम केले आहे. अस्तित्व एक प्रेम कहानी, कुमकुम भाग्य, अम्मा या मालिकांचा समावेश आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here