बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता लेखक आणि कॉस्ट्यूम डिजाइनर असणाऱ्या करण जोहरचा आज 49 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या बद्दल काही खास गोष्टी
करण चित्रपट निर्माते यश जौहर यांचा मुलगा आहे. त्याने अभिनेता व्हावे अशी त्याच्या वडिलांची ईच्छा होती. पण करणला चित्रपट दिग्दर्शक व्हायचे होते.
करणने ‘दिलवाले दुल्हिनयां ले जाएंगे’ या चित्रपटामधून करियर सुरुवात केली. त्याने तेव्हा असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. त्यावेळी अभिनेता शाहरुख खानने करणला स्वतःचा चित्रपट डायरेक्टर करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर करणने स्वतःचा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाला सात पुरस्कार मिळाले होते तसेच प्रेक्षकांची विशेष पसंती होती.
करण सरोगसीच्या माध्यमातून यश आणि रुही या मुलांचा २०१७ मध्ये वडील झाला
‘कभी खुशी कभी गम,’ ‘कभी अलविदा न कहना,’ ‘माइ नेम इज खान,’ स्टूडेंट ऑफ द इयर,’ ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ या प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणने केले आहे.
करणने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल ‘An Unsuitable Boy’ या त्याच्या आत्माचरित्रामध्ये लिहिले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here