अकोला ः कोरोना संंकटामुळे रक्ताची नातीही दुरावली. अनेकांच्या नशिबी तर मृत्यूनंतर आप्तस्वकियांंकडून अंत्यविधीही नव्हता. अशा शेकडो मृतदेहांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे अस्थी स्वीकारण्यासही कुणी पुढे आले नाही. अखेर मोहत मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था बघणाऱ्या दीपक शिंदेनेच रक्षा विसर्जनासाठी या अज्ञातांचे आप्तस्वकीय होऊन पूर्णा नदीत विधिवत विसर्जन केले. (Deepak Shinde performs funeral on corona dead patients)

कोरोनामुळे अकोल्यात आजवर अनेक लोक मृत्यमुखी पडले. यामधील कित्येकांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार व अस्थी विसर्जन कुटुंबातील व्यक्तींकडून करण्याचे भाग्यही लाभले नाही. नातेवाईकांनी नाकारलेल्या शेकडो मृतदेहांवर जात-धर्म न बघता परिकियांनीच अंत्यसंस्कार केले.

कोरोनामुळे मृत बहुतांश व्यक्तींवर मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे शेकडो मृतदेहांच्या अस्थी व रक्षा स्वीकारण्यास नातेवाईकांची तयारी नाही.

कोरोना संकट काळापूर्वी अशा विधिंसाठी कर्मकांडांवर लाखो रुपये खर्च करणारे नातेवाईक, पोटची मुलंही कोरोनाच्या दहशतीने मृत्यनंतरचे सोपस्कार पाडण्यासाठी पुढे आले नाही. अशा शेकडो मृतदेहांची अस्थी व रक्षा मोहता मिल स्मशानभूमीत पडून होती. त्या मृतांच्या अंतिम संस्कारानंतरचे सोपस्कार पूर्ण करण्याची जबाबदारी अखेर मोहता मिल स्मशानभूमीतील व्यवस्था पाहणारे दीपक शिंदे यांनी स्वखर्चाने स्वीकारली.

विधिवत पूजन करून रक्षा विसर्जन
रक्ताच्या नात्यांनी नाकारलेल्या मृतदेहांची रक्षा व अस्थी विसर्जनाचे सोपस्कार दीपक शिंदेने पार पाडले. विधिवत पूजन करून गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात ही रक्षा व अस्थी सोडण्यात आले. दीपकच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे.

संपादन – विवेक मेतकर

Deepak Shinde performs funeral on corona dead patients

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here