ठाणे: कोरोना महामारीत उद्भवलेल्या भयंकर परस्थितीमुळे अनेक नागरिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा कठीण प्रसंगात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून गोरगरीब गरजूंना मदतीचा हात देत आहे. पण दुसरीकडे शिवसेनेच्या एका नगरसेवकाकडून चक्क दारूचे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप एका समाजसेवकाने केला आहे. तसेच याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांसह राज्य उत्पादन शुल्क आणि पालिका आयुक्तांकडे निवेदन देत कारवाईची मागणीही केल्याचे समजते आहे. (Shivsena Leader Distributes Liquor in his Office Social Activist demands for Police Action)

Also Read: Sachin Waze Case: मुंबई पोलीस दलातील चौथा कर्मचारी बडतर्फ

Also Read: CBSE दहावीचा निकाल पुढे ढकलला; ‘ही’ आहे नवी तारीख

मागील वर्ष दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. अशातच या कोरोनाचा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहे. या काळात अनेक लोकप्रतिनिधी हे स्वतः शहरातील इतर भागात जाऊन गरीब आणि गरजूंना धान्य वाटप,जेवण वाटप तसेच काही जण ऑक्सिजन व प्लाझा वाटप करत असताना शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क मद्य वाटप करत आहेत. या मद्य वाटपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पक्षाची बदनामी असे नगरसेवक करत असल्याने या नगरसेवकांवर पक्षाने कडक कारवाई करावी. अशी मागणी पोलीस आयुक्त व अन्य विभागांना दिलेल्या निवेदनात समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. तसेच हा नगरसेवक एका आमदाराच्या खास मर्जीतील असल्याचे समजते.

Also Read: तसं घडलं तर आम्ही नक्कीच पेढे वाटू- संजय राऊत

भाजप नेते निरंजन डावखरे यांनीही या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “ठाण्यात पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेना नगरसेवकाकडून खुलेआम मद्य वाटप …स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या विचारांना शिवसेनेकडून ठाण्यात तिलांजली??”, असं ट्वीट त्यांनी केलं.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here