सातारा : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज मंगळवार (ता. 25) पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये गंभीर आजारपण किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू या कारणाव्यतिरिक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व दुकाने व बॅंकाही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना या दोन कारणाव्यतिरिक्त बाहेर पडण्यास बंदी आहे.साताऱ्यातील कडक लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढवला असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दहा हजार दंडाची तरतूद केली आहे.लाॅकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करत शंभरहून अधिक गाड्या जप्त केल्या. या गाड्या लाॅकडाउन संपल्यानंतर परत मिळणार आहेत.सध्या जगावर कोरोना विषाणूचं संकट उभं ठाकलं आहे. या महामारीनं माणसासोबतच प्राणीमात्रांवर देखील उपासमारीची वेळ आलीय. त्यातच साताऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्याने माणसांना बाहेर पडणे मुश्किल झालेय, त्यामुळे या वानरांना दररोज मिळणार खाऊ यानिमित्ताने बंद झालाय. मात्र, काहींकडून या वानरांची विशेष काळजी घेतली जात आहे.या कोरोना महामारीमुळे प्रत्येकाच्या व्यवसायाला कात्री लागलीय. यात अनेकांचे संसार उध्दवस्त झाले, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकजण नदीचा किनारा गाठत मासे पकडून आपला उदरनिर्वाह चालण्याचा प्रयत्न करत आहेत.सध्या जगावर महाभयंकर आपत्ती ओढवलीय. त्यात राज्यातील काही भागात कडक निर्बंध, त्यामुळे बाहेर फिरणेही मुश्किल झालेय. ना कोणत्या मैदानावर जाता येतं, ना कोणता खेळ खेळता येतं, त्यामुळे काही मुलांनी आपल्या काॅलनीलाच क्रिकेटचं मैदान बनवून या खेळाचा मनमुराद आनंद लुटला आणि कोरोनाला घाबरायचं नाही असाच काहीसा संदेश दिला.