मुंबई – बॉलीवूडचा किंग खान म्हणून परिचित असणारा शाहरुख (shah rukh khan )सोशल मीडियावर (social media) प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. मात्र प्रत्यक्षात शाहरुख त्याच्या इंस्टावर फक्त सहा जणांनाच फॉलो करतोय असं जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ती लोकं कोण आहेत हे आपण या पाहणार आहोत. मोठ्या काळापासून शाहरुखचा कुठलाही मुव्ही आलेला नाही. तो येत्या काळात वेबसीरिजच्या माध्यमातून समोर येणार असल्याचीही चर्चा आहे. ( social shah rukh khan follows only 6 people instagram see list to know the name )
झिरो (zero) हा शाहरुखचा शेवटचा चित्रपट होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. तो बॉक्स ऑफिसवर (Box Office) पडला. नेटक-यांनीही त्या चित्रपटाला ट्रोल केले होते. शाहरुखला त्या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग करायचा होता. मात्र तो फसला आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागली. सोशल मीडियावर शाहरुखचा चांगला प्रभाव आहे. तो त्याच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो. शाहरुखला इंस्टावर (followers on instagram) फॉलो करणा-यांची संख्या आहे 24.8 मिलियन. तो मात्र सहाच जणांना फॉलो करतो.

गेल्या काही काळापासून शाहरुखचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झाला नसेल मात्र त्याचा परिणाम त्याच्या चाहत्यांवर झालेला नाही. त्याच्या स्टारडमला फरक पडलेला नाही. आजही त्याची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. इंस्टावर शाहरुख ज्या लोकांना फॉलो करतोय ती त्याच्या अतिशय जवळची लोक आहेत हे स्वाभाविक आहे. मात्र त्याशिवाय तो कोणालाही फॉलो करत नाही. त्याचे कारण त्यालाच माहिती.
Also Read: ‘लग्नाला दोन वर्षे झालीत, सध्या एवढचं सांगेन’…
Also Read: चित्रपटाचं वेड! अवलियाने आयफोनवर शूट केला ‘पिच्चर’
जेव्हा तुम्ही शाहरुखचे इंस्टा अकाउंट पाहाल त्यावेळी तुम्हाला तो सहा व्यक्तींना फॉलो करत असल्याचे दिसून येईल. त्यात पहिले नाव काजल आनंदचे आहे. त्यानंतर त्याचा मुलगा आर्यन खान, पूजा डडलानी आणि चौथं नाव आलिया चीबाचे आहे. पाचवे नाव शाहरुखची पत्नी आणि सहावं नाव त्याच्या मुलीचं म्हणजे सुहानाचे आहे.
Esakal