पुणे – शहरासह जिल्ह्यात (Pune District) आतापर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार (३८ टक्के) नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. त्यापैकी ५ लाख ६६ हजार ८३६ (११ टक्के) नागरिकांना लसीचा दुसरा डोस (Second Dose) मिळाला आहे. तर, सुमारे ३२ लाख १६ हजार (६२ टक्के) नागरिक अद्याप लसीच्या प्रतीक्षेत आहेत. (62 Percent Citizens in Pune District without Vaccine)

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील लोकसंख्या एक कोटी १७ लाख आहे. त्यापैकी लसीकरणासाठी अपेक्षित लाभार्थींची संख्या ५१ लाख ७५ हजार इतकी आहे. पुण्यात लसीचा तुटवडा निर्माण होण्यापूर्वी लसीकरणाने चांगला वेग घेतला होता. राज्यात कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. पुणे जिल्ह्यात ३८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला. तर, तर ११ टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
Also Read: पुण्यातील इंजिनिअरचं हटके ‘टूल’; PPE किट ठेवणार ‘कूल’
-
६९९ जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे
-
५१,७४,७७१ अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या
-
१९,५८,०६५ पहिला डोस (३८ टक्के)
-
५,६६,८३६ दुसरा डोस (११ टक्के)
ज्येष्ठांचे ८० टक्के लसीकरण
जिल्ह्यातील ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांचे ८० टक्के लसीकरण झाले आहे. ज्येष्ठांची संख्या दहा लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी ७ लाख ८० हजार ५१८ ज्येष्ठांना लसीचा पहिला डोस मिळाला असून २ लाख ६७ हजार २८२ ज्येष्ठांना दुसरा डोस देण्यात आला. लशीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील केवळ ५० हजार नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे.
प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न केले. ज्या केंद्रांवर सुरुवातीच्या कालावधीत लसीकरण जास्त झाले, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा झाला. जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ८५ हजारपर्यंत लसीकरणाचा टप्पा गाठला आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
Esakal