‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेच्या लोकप्रियतेमागे जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांचा मोठा वाटा आहे. आज लाखोंची कमाई करणाऱ्या दिलीप जोशींना एकेकाळी अवघ्या ५० रुपयांसाठी संघर्ष करावा लागत होता. दिलीप यांनी गुजराती रंगभूमीवरून कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायचे. त्यावेळी त्यांना केवळ ५० रुपये मिळायचे. आता दिलीप जोशी हे एका एपिसोडसाठी जवळपास दीड लाख रुपये मानधन घेतात. त्यांच्याकडे Audi Q-7 आणि Innova या गाड्यासुद्धा आहेत. जेठालाल यांच्या लग्नाला २० वर्षे झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव नियती तर मुलाचं नाव ऋत्विक आहे.