सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : आरोस वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचे मृत माकड आढळल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनाच त्यावर अंतिम संस्कार करण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोयरसुतक नसलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा– राजू शेट्टींनी केलं आवाहन अन् तरुणीने घेतला हा धडाकेबाज निर्णय… –
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची आज आवश्यकता असताना देखील अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. आरोस वरचीआळी येथे शेतकरी महेश आरोसकर यांच्या काजु बागेत मृत माकड दिसून आले. गावात पूर्वी तीन माकड मृत सापडले होते. त्यावेळी वारंवार वनविभागास कळवूनही दखल न घेतल्याने आजच्या घटनेची खबर त्यांनी आरोग्य विभागास दिली ; परंतु निद्रावस्थेत तसेच बेजबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी घटनास्थळी येणे टाळले व ग्रामस्थांनाच त्या मृत माकडाची विल्हेवाट लावण्यास सांगितले.
हेही वाचा– चांदा-बांदा बंद पडू देणार नाही : विनायक राऊत
ग्रामीण भागाकडे कानाडोळा
त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे काजू बागायतदार महेश आरोसकर यांनी सांगितले. शेवटी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी देऊ परब व गोपाळ नाईक यांनी त्या मृत माकडाची विल्हेवाट लावली. वनविभागाशी संपर्क साधला असता, मृत माकडांची विल्हेवाट लावण्याचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतला दिले आहेत. तरी सुद्धा आम्ही जवळपास असल्यास घटनास्थळी जात असल्याचे आजगाव वनपाल श्री. धुरी यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

News Story Feeds