अभिनेत्री प्रिया बापटचे इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर बरेच फॉलोअर्स आहेत. प्रिया तिचे अनेक फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. लॉकडाउनमध्येही फोटोशूटसाठी प्रियाने अनोखी शक्कल लढवली आहे. कधी इमारतीच्या गच्चीवर, कधी अंगणात तर कधी अगदी गेटजवळ प्रियाने भन्नाट फोटोशूट केले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लॉकडाउनचा परिणाम प्रियाने तिच्या कामावर किंवा वर्कआऊटवर होऊ दिला नाही. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ प्रिया बापट)