चक्रीवादळामुळे 140 हून जास्त किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. समुद्रात 6 मीटर उंच लाटा उसळल्या आहेत.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके तैनात असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.
यास चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीला धडकले असून पश्चिम बंगालसह ओडिशातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
वादळामुळे किनारपट्टीच्या भागात पाणी शिरले आहे.
वादळाचा फटका बसलेल्या भागातील लोकांना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित स्थळी नेले.
लष्कराच्या तुकड्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफने पाच राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात 115 पथके तैनात केली आहेत.
समुद्र किनाऱ्यावर असलेल्या परिसरात उंच लाटांचे पाणी वेगाने शिरले.
किनाऱ्यावर असलेल्या शेड, घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here