पुणे : सध्या तरुणाईमध्ये सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअर स्टाईलची क्रेझ आहे. अनेकजण लग्न समारंभात स्टायलीश लूक मिळवण्यासाठी काही न काही ट्राय करत असतोच. जो तो आपण मस्त दिसावं यासाठी हटके अंदाज ट्राय करतो. त्यात अनेक तरुणी आणि स्त्रियांना लग्न समारंभात काही हटके हेअर स्टाईल करण्याची इच्छा असते. ज्यामुळे आपला लुक स्टाईलिश आणि सुंदर दिसला पाहिजे. चला तर मग काही हटके हेअर स्टाईल करण्यासाठी इथे दिलेल्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही एक वेगळा लूक मिळवू शकता.

योग्य हेअर कलर निवडा :

हेअर कलरवेळेस तुमच्या केसांना शेड करताना योग्य कलर निवडा. सर्वांना एकच हेअर कलर सूट होईल असं नसत. त्यामुळे तुमच्या केसांना जो कलर सूट होईल तोच कलर निवडा.

हेअर कट शेड्युल करा :

सुरवातीला हेअर स्टाईलिस्ट सोबत हेअर कटबद्दल सविस्तर बोलून घ्या. हेअर कट करण्यापूर्वी तुम्हाला कशा पद्धतीने हेअर कट हवी आहे ते सांगा. जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असेल तर आधी केस वाढवून घ्या. आणि तुमच्या पहिल्या कटला दोन महिने ट्रिम करत राहा.

केसांची निगा राखा :

आपल्या केसांची योग्य निगा राखली पाहिजे. जेणेकरून केस व्यवस्थित राहतील. केसांची निगा राखण्यासाठी तेल आणि शॅम्पोचा योग्य वापर करा

योग्य हेअर स्टाईलिस्ट निवडा:

जर तुम्ही तुमची हेअर स्टाईलिस्ट निवडत असाल तर चांगल्या पद्धतीने निवडा.

सुरवातीला अनुभवी व्यक्तींना प्राधान्य द्या. कधी ही हेअर कट आणि हेअर कलर करताना नवीन आणि अनोळखी व्यक्तींकडून करू नका.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here