कुटुंबासोबत फिरायला जायचे असल्यास देशात अनेक लोकेशन आहेत. जगभरात किंवा देशात विविध ठिकाणी तुम्ही फिरण्याचा आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. आपल्या देशात अशी अनेक बेस्ट लोकेशना आहेत जिथे तुम्ही काही दिवसांसाठी फॅमिली ट्रीप अॅरेंज करु शकता. याशिवाय काही दिवस राहण्याचाही प्लॅन करु शकता.
मैक्लोडंगज

हिमाचल प्रदेशामध्ये असलेले मैक्लोडगंज हे ठिकाणं कुटुंबासोबत पर्यटनासाठी योग्य आहे. देशातील इतर प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथील तिबेटियन संस्कृती पाहण्यासाठी तुम्ही कांगडा किल्ला, भागसुनाथ मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.

गंगकोट

नॉर्थ इस्टमध्ये असलेली अनेक ठिकाणे ही फॅमिली ट्रीप साठी बेस्ट आहेतच. यामध्ये एक म्हणजे गंगकोट. येथे असलेल्या जूलॉजिकल पार्कला मुले खास पसंती देतात.

गोकर्ण

दक्षिण भारतात वसलेले गोकर्ण हे ठिकाण परिवार सोबत पर्यटनासाठी बेस्ट ठिकाण आहे. दरवर्षी याठिकाणी परदेशातूनही अनेक कुटुंबे फिरण्यासाठी येतात.

राणीखेत

फॅमिलीसोबत फिरायचे असल्यास राणीखेत हे एक बेस्ट लोकेशन आहे. वर्षातील काही महिने बाहेर फिरण्याचा प्लॅन असेल तर हे उत्तम लोकेशन ठरवू शकता.

पहलगाम

तुम्हाल जर उत्तर भारतातील जम्मु आणि काश्मिरला पर्यटन करायचे असल्यास पहलगाम लोकेशन तुम्ही फायनल करु शकता. याला हीलस्टेशन म्हणूनही ओळखले जाते.

कुर्ग

पर्यनसाठी गेला असाल आणि कुटुंब सोबत असेल तर कुर्गच्या समुद्री तट असलेल्या लोकेशनला तुम्हाला नक्की आवडेल. याठिकाणी पाहण्यासाठी एबी फॉल्स, मदिकेली किल्ला, होननामना केर झील अशी अनेक लोकेशन आहेत.

उटी

सुंदरता आणि अद्भुत नजारे यासाठी देशातील उटी प्रसिद्द आहे. कोणत्याही कुटुंबासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. या ठिकाणाला क्वीन ऑफ हिल्स म्हणूनही ओळखले जाते.

सिक्कीम

पूर्व भारतात फॅमिलीसोबत फिरायचे असल्यास गंगकोट सोबत सिक्किम हेही बेस्ट ठिाकण आहे. येथील हनुमान टोक आणि त्सोमो झील ही स्थळे प्रसिद्ध आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here