वेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाली आहे. तसे लेखी पत्र नम्रता कुबल यांना प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजियाताई खान, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हा निर्णय जारी केला.
हेही वाचा– भडका उडाला आणि उध्वस्त झाले तिचे आयुष्य..
कुबल यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस संघटना मजुबुतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाची पोच प्रदेश राष्ट्रवादीच्या महिला नेतृत्वाकडून घेतली आहे. पक्ष संघटना वाढीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे कुबल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा– कोकणात चार वर्षांच्या माकडाची दहशत….
उत्कृष्ट कामाची पोच पावती
शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, जिल्ह्यातील बेसिक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमित सामंत, कार्याध्यक्ष अबिद नाईक, भास्कर परब, प्रवीण भोसले, सुरेश दळवी, प्रसाद रेगे, व्हीक्टर डॉंन्टस, नंदूशेठ घाटे, बाळ कनयाळकर, नाझीर शेख, राजू पाताडे, पुंडलिक दळवी, डॉ. साठे, दिपिका राणे, सत्त्यवान साटेलकर, सुप्रिया परब, डॉं. संजीव लिंगवत, धर्माजी बागकर आदींनी अभिनंदन केले.

News Story Feeds